धक्कादायक! नॉर्वेत कोरोना लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू
![Shocking! 29 die after corona vaccine in Norway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Women-wiil-get-beard-if-they-take-Pfizer-vaccine-says....jpeg)
ओस्लो – संपूर्ण जण कोरोना संसर्गाचा सामना करत असतानाच नॉर्वे सरकारसमोर नवं संकट उभं राहिलं आहे. नॉर्वे देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर या घटना घडल्या आहेत.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,05,57,985 वर
नॉर्वेत २७ डिसेंबरपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली असून फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचे समोर आले. यात शनिवारी २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला. मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. लस घेतल्यानंतर या नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास जाणवला होता.
दरम्यान, अनेक देशांमध्ये कोरोना लसींच्या आपत्कालीन वापरासाठीही परवानगी देण्यात आली असून लसीकरण अभियानही सुरू करण्यात आले आहे. याचदरम्यान लसीकरण मोहीम राबवण्यात येत असलेल्या नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण जग हादरलं आहे.