धक्कादायक! दोन हजार कि.मी. चालत घरी पोचला, नी सर्पदंशानं दगावला
उत्तर प्रदेशातील सलमान खान नावाच्या एका तरूणानं बंगळुरू ते उत्तर प्रदेशातील आपल्या घरापर्यंत असा तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास केला. घरी पोहोचल्यानंतर त्यानं आपल्या आईची गळाभेट घेतली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. याचदरम्यान त्याला सर्पदंश झाला. २६ मे रोजी ही घटना घडली. डोळ्यात तेल ओतून आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या त्या आईला या घटनेनंतर मोठा धक्का बसला.
उत्तर प्रदेशात पोहोचल्यानंतर त्याला काही दिवस क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर २६ मे रोजी तो घरी पोहोचला होता. परंतु घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी असलेल्या कंत्राटदारानं त्यांना पैसे देण्यास मनाई केली. त्यामुळं त्यानं बंगळुरू ते उत्तर प्रदेश असा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता.