breaking-newsताज्या घडामोडी

धक्कादायक! घरी उशिरा आली म्हणून महिलेचा निर्घृण खून

नागपूर | महाईन्यूज

घरी परत येण्यास उशीर झाल्याने चिडलेल्या तरुणाने महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण करीत तिच्या कपाळावर बत्त्याने वार केले आहेत. त्यात तिचा घटनास्थळीच मृत्यू झालेला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. विशेष म्हणजे, दोघेही काही दिवसांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. ही घटना बुधवारी (दि. १५) रात्री उघडकीस आलेली आहे.अलका टेंभेकर (२८) असे मृत महिलेचे नाव असून, सिद्धार्थ प्रेमजी सोनपिंपळे (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दोघेही सम्राट अशोक चौक, डॉ. आंबेडकर नगर, वाडी येथे राहत होते.

अलका बुधवारी सकाळी सिद्धार्थला न सांगता बाहेर गेली होती. तिला घरी परत यायला उशीर झाल्याने तो चिडला होता. संशयी स्वभावाच्या सिद्धार्थने तिला उशिरा येण्याचे कारण विचारत तिच्याशी भांडायला सुरुवात झाली वाद विकोपास गेल्याने त्याने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याने तिच्या कपाळावर बत्त्याने वार करून जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेतील अलका गतप्राण होताच सिद्धार्थने तिथून पळ काढला. दिवसभर दारू पिऊन तो फिरत राहिला. त्यानंतर त्याने रात्री १० वाजताच्या सुमारास स्वत: पोलीस ठाणे गाठले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून अलकाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. शिवाय, घटनास्थळाहून काही साहित्य जप्त करून सिद्धार्थला अटक केली. पोलीस उपायुक्त विवेक मासाळ व सहायक पोलीस आयुक्त सिद्धार्थ शिंदे यांनी घटनास्थळावर घटनेची माहिती जाणून घेतली. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तपास ठाणेदार राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अमोल लाकडे करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button