breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! केरळ मध्ये कोरोना बाधित मुलीवर अँबुलंस ड्रायव्हरकडून बलात्कार

केरळ: कोरोना पॉझिटीव्ह 19 वर्षीय मुलीवर अम्ब्युलन्स ड्रायव्हरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना केरळ येथून समोर येत आहे. ही घटना केरळमधील पठानमथिट्टा जिल्ह्यातील अरणमुला येथे रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेली आहे. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने पीडितेला कोझेनचेरी येथून कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात येत होते. त्यावेळेस मुलीवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेल आहे. नौफळ असे त्याचे नाव असून तो कायमकुलमचा रहिवासी आहे.स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या अम्ब्युलन्समध्ये 2 रुग्ण होते.

एकाला कोझेनचेरी जिल्ह्यातील रुग्णालयात सोडण्यात आले आहे. त्यानंतर आरोपीने अम्ब्युलन्स निर्जन ठिकाणी नेली आणि 19 वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. “पहिल्या रुग्णाला हॉस्पिटलमध्य सोडल्यानंतर रुग्णवाहिका चालक मुलीला घेऊन एका निर्जन स्थळी गेला आणि तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. त्यानंतर त्याने मुलीला कोविड केअर सेंटरमध्ये सोडले,” अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button