breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक! इचलकरंजीत यंत्रमाग कामगाराचा मित्रानेच केला खून, अर्धा तासात आरोपी जेरबंद

इचलकरंजी नजीक कोरोची येथे यंत्रमाग कामगाराचा खून झाल्याची घटना सोमवारी घडली. सहकारी कामगारानेच मित्राचा केला खून केला असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अर्धा तासात संशयित आरोपीस पकडले आहे.राजू आनंदा चव्हाण (वय 52 वर्षे, डांगे गल्ली सिध्दार्थ नगर झोपडपट्टी कबनूर)असे आरोपीचे नाव आहे. तर, अंकुश मारुती मोरे असे मृत कामगारांचे नाव आहे.

कोरोची येथील धनगर माळ येथील ही घटना आहे. याच भागात गेल्या आठवड्यात मद्यपी मुलाच्या त्रासाला कंटाळून आईने डोक्यात वरवंटा घालून त्याचा खून केला होता. एकाच आठवड्यात खुनाचे दोन प्रकार घडल्याने या भागात खळबळ उडाली आहे.

अंकुश मोरे व राजू चव्हाण हे दोघेही एकाच यंत्रमाग कारखान्यात काम करीत होते. गेल्या तीन महिन्यापासून चव्हाण याने कारखान्यातील काम सोडले आहे. आज दुपारी या कारखान्याच्या बाजूला असलेल्या कामगारांच्या खोलीमध्ये या दोघांत वाद झाला. त्यातून राजू चव्हाण याने डोक्यात दगड घालून अंकुश मोरेचा खून केला. कारखान्याचे मालक सायंकाळी कारखान्यात आल्यानंतर त्यांनी कामगारांच्या खोलीत डोकावून पाहिले असता खून झाल्याचे उघडकीस आले.  त्यानंतर इचलकरंजी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तातडीने तपास यंत्रणा गतिमान केली आणि संशयित आरोपी राजू चव्हाण यास ताब्यात घेतले, अशी माहिती इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.

मृत कामगार मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे. कोरोचीमधील धनगर माळ येथील महादेव कांबळे यांच्या कारखान्यात तो यंत्रमाग कामगार म्हणून काम करत होता.खून झाल्याची माहिती मिळताच  शहापुर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश निकम हे सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले होते.  खून नेमका कोणत्या कारणातून झाला याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button