धक्कादायक! अल्लाहचं नाव घेत चर्चमध्ये घुसून केला महिलेचा शिरच्छेद! फ्रान्स हल्ल्यात 3 ठार, का होत आहेत हे धार्मिक हल्ले?
पॅरिस: फ्रान्सच्या नीस शहरात एका माथेफिरू हल्लेखोराने अल्लाह अकबरचा नारा देत चर्चमध्ये घुसून चाकू हल्ला केलेला आहे. एका महिलेचा थेट शिरच्छेद करत अनेकांना त्यानं भोकसलं आहे. या भीषण हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. नीस शहराच्या महापौरांनी हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता व्यक्त केली, कारण त्यामागे आहे फ्रान्समध्ये सुरू असलेला धार्मिक तणाव आहे. नीसचे मेयर ख्रिस्तियन इस्टोर्सी यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलेलं आहे. आता नीस शहराच्या चर्चमध्ये हल्ला करणारा पोलिसांच्या ताब्यात आहे. फ्रान्सच्या दहशतवादविरोधी पथकातील अधिकारी या प्रकरणी तपास करत आहेत.
दक्षिण फ्रान्समधल्या नीस शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या नॉत्र दाम या चर्चाजवळ झालेल्या चाकू हल्ल्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झालेला असल्याचं वृत्त आहे. हल्लेखोर अल्लाहू अकबरचा नारा देत सपासप वार करत राहिला, असं स्थानिक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेली आहे. फ्रेंच वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत क्रूरपणे हा हल्ला झाला. नाईस शहरातल्या नॉत्र दाम चर्चजवळच हल्लेखोरांनी चाकूने थेट हल्ला केला. यात एका महिलेचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे. आणखी एक जण रुग्णालयात दाखल करत असतानाच मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी आहेत.





