breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशाविरोधी भाषण करणाऱ्या शरजीलची रवानगी पोलिस कोठडीत

दिल्ली |देशद्रोहाच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेल्या शरजील इमामला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी बुधवारी शरजील इमाम याला दिल्लीतील एका न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने शरजीलची रवानगी पोलिस कोठडीमध्ये केली आहे.

डीसीपी राजेश देव यांनी सांगितले, दिल्ली पोलिसांनी शरजील इमामची ५ दिवसांची कोठडी मागितली होती. देशविरोधी भाषण करणारा जवाहर लाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शरजील इमामला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी बिहारमधील जहानाबाद येथून अटक केली होती. इमामवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोशल मीडियावर शरजीलचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो आसामबाबत प्रक्षोभक भाषण करताना दिसत होता. दिल्ली पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button