देशात 24 तासांत 55,722 नवे कोरोना रुग्ण
![2,95,041 new positive patients in 24 hours in the country; 2,023 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/India_Corona.jpg)
- भारताने 75 लाखांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 55 हजार 722 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 579 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 75 लाख 50 हजार 273 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 14 हजार 610 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 66 लाख 63 हजार 608 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 7 लाख 72 हजार 055 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता रुग्णसंख्या घटताना दिसत आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 8 राज्यांमध्ये 48 टक्के रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यात महाराष्ट्रातील 15 जिल्हे, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरातमधील प्रत्येकी दोन जिल्हे आणि पंजाब, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशातील प्रत्येकी एका जिल्ह्याचा समावेश आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यासह 10 राज्ये अशी आहेत जिथे कोरोनाचे 77 टक्के रुग्ण आढळून आले आहेत.