देशात कोरोनाचा कहर सुरूच, ६४ हजार ५५३ नवे रुग्ण आढळले
![# Covid-19: Corona death toll rises to 103.3 million worldwide, death toll rises to 2.23 million](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/World-CoronaVirus.jpg)
नवी दिल्ली | संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. जगभरात कोरोनाच्या संख्येने तब्बल दोन कोटींचा आकडा पार केला आहे. तर सात लाखाहून अधिक जणांना या महामारीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा कहर सुरूच आहे. देशात दररोज 60 हजारांच्यापुढे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या 24 तासांत देशात 64 हजार 553 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 1 हजार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 24 लाख 61 हजार 191वर पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 48 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6 लाख 61 हजार 595 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 17 लाख 51 हजार 556 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.