देशातील हिंसाचार हे केंद्रीय गृह मंत्रालयाचे मोठे अपयश; सुप्रिया सुळेंची अमित शहांवर सडकून टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/supriya-sule-amit-shaha-Frame-copy.jpg)
बारामती | महाईन्यूज
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन देशात जो हिंसाचार सुरु आहे हे केंद्रीय गृहमंत्रालयाच अपयश आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अमित शहांना लगावला आहे. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलताना त्यांनी पत्रकारांना सांगितले आहे. देशात पहिल्यांदाच एवढा अत्याचार पाहिला असून देशाला आणि राज्याला शांततेची गरज असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, दिल्लीत विद्यार्थ्यांना जी मारहाण करण्यात आली या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती चौकशी व्हायला हवीच आहे. देशात अनेक प्रश्न आणि समस्या असताना यावरुन लक्ष दुसरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यातील विधिमंडळात सुरु असणाऱ्या विरोधकांच्या गोंधळाचाही सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मागील ५ वर्षात केलेला गोंधळ बाहेर येऊ नये या भीतीनेच विरोधत सभागृहात गोंधळ घालत आहेत असा आरोप त्यांनी केला आहे.