देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2.46 लाखांच्या पार, 6,929 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा प्रसार कमी व्हावा यासाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता जून महिन्यापासून लॉकडाउन संपवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. मात्र सध्याच्या दिवसामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढत असल्याचे चित्र आहे. रविवारी सकाळी आलेल्या अपडेट्सनुसार एकूण कोरोना रुग्णांची संख्या वाढून ही 2,46,628 एवढी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 1,19,293 रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. भारतात रविवारी सकाळपर्यंत कोरोना व्हायरसमुळे जवळपास 6,929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारताने इटलीला मागे टाकत कोरोना व्हायरस या जागतिक महामारीमध्ये सर्वात जास्त प्रभावत असलेला सहावा देश बनला आहे. अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकड्यांनुसार अमेरिका, ब्राजील, रुस, स्पेन आणि बिटेननंतर कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण हे भारतात आहे. भारत आता जगभरात कोरोनाच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले देशात आता 1,20,406 कोरोना संक्रमितांवर उपचार सुरू आहेत. तर 1,19,293 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर एक रुग्ण हा देशा बाहेर गेला आहे. दरम्यान महाराष्ट्र हा देशात कोरोना रुग्णांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.