देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,02,86,710 वर
![Be careful! These new symptoms of corona came to the fore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/CoronavirusSARS-CoV-2deCDCenUnsplash.jpg)
नवी दिल्ली – देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापली काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातच देशात मागील 24 तासांत 20,036 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 256 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 1,02,86,710 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,48,994 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 23,181 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 98,83,461 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 2,54,254 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-2 जानेवारीला राज्यातील ‘या’ 4 जिल्ह्यात होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या 1 कोटीच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्याने सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे.