Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
देशातील कोरोनाबाधितांची संख्या 88,45,127 वर
- 24 तासांत 30,548 नवे रुग्ण
नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 30,548 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 435 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 88,45,127 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,30,070 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 43,851 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 82,49,579 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 4,65,478 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.





