ताज्या घडामोडी

दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा टीम इंडियाने केला १०६ धावांनी पराभव

विशाखापट्ट्नम (Pclive7.com):- भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या विशाखापट्ट्नम कसोटी सामन्यात टीम इंडियाने 106 धावांनी विजय मिळवला आहे. त्याचबरोबर टीम इंडियाने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली आहे. यशस्वी जयस्वालची द्विशतकीय खेळी, शुभमन गिलचं दमदार शतक आणि बुमराहच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघाने नांगी टाकली. बुमराहने दोन्ही डावात मिळून एकूण 9 विकेट्स घेतल्या. टीम इंडियाने चौथ्या दिवशी सामना खिशात घातला.
पहिल्या डावात यशस्वी जयस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर टीम इंडियाने 396 धावांची मोठी आघाडी उघडली होती. त्यानंतर इंग्लंडच्या पहिल्या डावात टीम इंडियाने मजबूत पकड मिळवली. इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांवर खल्लास झाला. जसप्रीत बुमराहच्या भेदक कामगिरीमुळे टीम इंडियाला बाजी मारता आली. त्यामुळे टीम इंडियाला 143 धावांची आघाडी मिळाली होती. अशातच आता दुसऱ्या डावात शुभमन गिलच्या शतकीय खेळीमुळे टीम इंडियाला 255 धावा करता आल्या. इंग्लंडला विजयासाठी 399 धावा करायच्या होत्या. मात्र, आश्विन आणि बुमराहने अचूक टप्प्यात गोलंदाजी केल्याने टीम इंडियाला 106 धावांनी विजय मिळवता आला आहे.
इंग्लंडच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगलंच कडवी टक्कर दिल्याचं पहायला मिळालं. जेम्स अँडरसनने टीम इंडियाला अडचणीत आणलं होतं. तर इंग्लंडच्या पहिल्या डावात जॅक क्राउली आणि बेन स्टोक्स यांनी इंग्लंडला तारल्याने यजमानांना 250 पार करता आल्या. मात्र, इंग्लंडने भारताला दुसऱ्या डावात डोकं वर करु दिलं नाही. स्पिनर्सचा मारा करत बेन स्टोक्सने भारतावर पहिल्यांदाच पकड मिळवली होती. तिथून इंग्लंड त्यांच्या बेझबॉल टेकनिकने सामना जिंकेल, अशी शक्यता होती. मात्र, रोहितने बुमबुम टेकनिकच्या आधारे इंग्रजांच्या दांड्या उडवल्या.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button