दिल्ली हिंसाचार प्रकरणाला भाजपा नेता कपील मिश्राच जबाबदार ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-234.png)
दिल्ली हिंसाचार प्रकरणातील मृतांचा आकडा आता 48 वर येऊन पोहोचला आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं… १३६ दंगेखोरांना अटक करण्यात आली आहे…या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 48 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दिल्लीत सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/kapil-mishra_1582706374.jpeg)
सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने दिल्लीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं..त्यामध्ये अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप होत आहे…मशिदीचीही तोडफोड केली…१ हजार लोकांचा जमाव बडी मशिदीजवळील कॉलनीत घुसला. त्यावेळी याठिकाणी मशिदीत २० जण नमाज अदा करत होते. तेव्हा अचानक लोकांचा मोठा जमाव मशिदीत घुसला आणि जोरदार घोषणा देऊ लागला. सर्वजन जीव वाचवण्यासाठी पळत होते… हल्लेखोरांनी ६ जणांना जाळले, जमावाने मशिदीची तोडफोड करुन पेटवून दिली.अनेक मुस्लिमांची घर लुटण्यात आली…अनेक जणांना बेघऱ व्हाव लागल आहे,,,
या सर्व प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेच्या दोन एसआयटी करतील. या दंगली सुनियोजित कटाचाच एक भाग असल्याचा दावा पोलिसांनी सोमवारी केला होता. दंगलग्रस्त भागात अनेक ठिकाणी मोठ्या गुलेरसारखे पेट्रोल बॉम्ब लाँचर, पेट्रोल बॉम्ब, दगड-गोटे, अॅसिड पाऊच सापडल्याने सुनियोजित कटाच्या शंकेला बळ मिळते. मात्र, या कटातील सहभागाविषयी पोलिसांनी अद्याप काहीही जाहीर केलेले नाही.
दिल्ली हिंसाचार प्रकरणाचा चौकशी आता विशेष तपास पथकाच्या (SIT) माध्यमातून करण्यात येणार आहे. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने चौकशी करण्यासाठी दोन एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीच्या एका पथकाचे नेतृत्त्व डीसीपी जॉय तिर्की तर दुसऱ्या पथकाचे नेतृत्त्व हेड डीसीपी राजेश देव करणार आहेत. दोन्ही पथकात चार-चार असे एकूण आठ एसीपी असतील. याशिवाय तीन-तीन इन्स्पेक्टर, चार-चार सब-इन्स्पेक्टर आणि पोलिस कॉन्स्टेबल असतील. दोन्ही एसआयटीवर एडिशनल सीपी, क्राइम बी.के सिंह यांचे लक्ष राहणार आहे. उत्तर-पूर्व दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणी आतापर्यंत 48 FIR कॉपी दिल्ली पोलिसांनी एसआयटीकडे सुपूर्द केल्या आहेत.
दिल्ली पोलिसांचे प्रवक्ता एमएस रंधावा यांनी सांगितले की, हिंसाचाराचे सुमारे एक हजार सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत. ते तपासण्याचे काम सुरू आहे. सध्या उत्तर-पूर्व दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे. जनजीवनही पूर्वपदावर येत आहे.
दरम्यान दिल्ली मध्ये होत असलेल्या हिंसाचाराला भाजपा नेता कपील मिश्राच जबाबदार असल्याचं म्हटलं जात आहे…त्यांनी चिथावनीखोर वक्तव्य असलेलं भाषण केलं त्यामुळे CAAच्या समर्थनार्थ निघालेल्या चळवळीला ईतक हिंसक वळण लागलं…असं म्हटलं जात..एवढच नाही तर, डोनाल्ड ट्र्म्प भारत दौ-यावर हेत तोपर्यंत आपण 2 दिवस शांतंतेत चळवळ करु मात्र त्यानंतर आम्हाला रस्ते रिकामे नाही मिळाले तर आम्ही कुणाचही ऐकणार नाही असं वक्व्य केलेला त्याचा एक व्हिडिओ समोर आला…हे सगळं तेव्हा सुरु झालं जेव्हा मुस्लिम महिलांनी ईशान्या दिल्लीतील रस्ते..CAA च्या विरेधात मोर्चे काढले होते तेव्हा अडवून धरले होते…त्यानंतर हे दंगे सुरु झाले…याच रुपांतर किती क्रुर पद्धतीत झालं हे आपल्या सर्वांना तर माहितच आहे…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/000-37.png)
कपिल मिश्रा हे 2017 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला..त्या आधी ते आम आदमी पार्टी मध्ये होते ..पण त्यांना नंतर पक्षात काढून टाकण्यात आलं…कारण त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर 2 करोड रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता…तसेच चौकशी करण्याच्या प्रक्रियेमध्ये देखील अडथळा आणल्याचा आरोप केजरीवालं यांच्यावर केला होता…मात्र नंतर सर्व चौकशी नंतर अरविंद केजरीवाल यांना लाच घेण्याच्या आरोपात क्लिनचीट मिळाली…भाजपात गेल्यानंतर कपिल मिश्राने नरेंद्र मोदींना सपोर्ट करण्यासाठी विशेष कॅम्पियनही घेतलं होत…आणि याच कपील मिश्राने मोदींना कधी काली ISI चा एजंट असल्यांचा आरोप केला होता…ISI च्या लोकांना मोदी सपोर्ट करतात असा आरोपही त्यानं केला होता…एकंदीतच त्यांच्या कारनामे पाहता लोकांध्ये रोष पसरव असो किंवा लोकांना भडकवण असो कायमच त्याची ही भुमिका राहिली आहे…भाजपामध्ये गेल्यावर तर कपील मिश्रा जास्त कॉन्ट्रोव्हर्शल झाला ..आता दिल्ली हिंसाचाराला कपिल मिश्राच जबाबदार असल्याच म्हटलं जात कारण 8 फेब्रुवारीला दिल्लीच्या रस्त्यावर भारत आणि पाकिस्तान मध्ये लढाई होणार आहे..कारण दिल्ली मध्ये अनेक ठिकाणी मिनी पाकिस्तान तयार झाले आहेत त्यांना भारतातून हटवण गरजेच आहे…त्यामुळे चिकथावणीखओर भाषण देऊन ,जातीयवाद घडून आणण्याला कपील मिश्रा जबाबदार असल्यांच कुठेतरी स्पष्ट होतय…
पण या हिंसाचारानंतर कपील मिश्राची भुमिका “ सौ चुहे खा के बिल्ली चली हज को” अशा काहीसा प्रकारची होती…कारण त्यांनी या दिल्ली हिंसाचारा बाबत भानविक ट्टीव करत म्हटलं की या हल्ल्यात अनेक जीव गेलेत अनेक जण बेघर झालेत त्यांना मदत करायला हवी…म्हणजे आग स्वत:च लावायची आणि सांत्वनही स्वत:च करायचं असा प्रकार झाला…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Capture-72.png)
या सर्व प्रकरणात आपली काहीच सहभाग नाही अस सांगणारे कपील मिश्रा या हिसांचारात आहे की नाही हे चौकशीतून नकीकच समोर येईल,…पण हा हिसांचारामुळे जात-पात या मुद्यावंर बोट न
ठेवता पाहतिल अनेक निष्पाप लोकांचे बळी मात्र नक्कीच गेले..अशी हिंसा पुन्ही कोणी भडकवण्याचा प्रयत्न करु नये एवढचं….