Breaking-newsताज्या घडामोडी
दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ; नागपूरचे विमान अडले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/airport-chao.jpg)
नागपूर | महाईन्यूज
वारंवार फ्लाईट लेट होत असल्याच्या कारणावरून व पर्यायी व्यवस्था नसल्याने शनिवारी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांनी प्रचंड गोंधळ घातला आहे. नागपूर येथे येणाऱ्या फ्लाईटचा यात समावेश होता.
नागपूरचे प्रवासी अजय पांडे यांनी सांगितले की, सायंकाळी ७.३० वाजता फ्लाईट नागपूरला येण्याची वेळ होती. मात्र रात्री ११ पर्यंत उड्डाणच भरले नाही. रात्री उशिरापर्यंत विमानतळ प्रशासन याबाबत नेमके कारण काय ते सांगायला तयार नव्हते. त्यामुळे इतर सर्व प्रवाशांनी गोंधळ घातला आहे.