दिल्लीतील सर्वच प्राथमिक शाळांना सुट्ट्या जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/corona-vrus.jpg)
नवी दिल्ली | कोरोना व्हायरसचा राजधानीत फैलाव रोखण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व प्राथमिक शाळा बंद ठेवणार असल्याचे गुरुवारी जाहीर केले आहे. आदेशानुसार, 31 मार्चपर्यंत शाळा बंद राहतील. यासोबतच, दिल्ली सरकारच्या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या बायोमॅट्रिक हजेरीवर सुद्धा बंदी लावण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला ब्रुसेल्स दौरा रद्द केला.
मोदी त्या ठिकाणी होणाऱ्या युरोपियन राष्ट्र आणि भारताच्या शिखर संमेलनात सहभागी होणार होते. दरम्यान, देशभरात कोरोना व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या 30 झाली आहे. आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यसभेत गुरुवारी ही माहिती दिली. सोबतच, परदेशातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी 21 विमानतळ आणि 12 बंदरांवर स्क्रीनिंग केली जात आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधींनी कोरोना व्हायरस सरकारच्या कामकाजाची खिल्ली उडवली. राहुल गांधी ट्विट करताना म्हणाले, “आरोग्य मंत्री सांगत आहेत की परिस्थिती नियंत्रणात आहे. ऐकून असे वाटते जसे टायटॅनिक जहाजाचा कॅप्टन प्रवाशांना सागतोय की जहाज बुडणार नाही. कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी सरकारला ताकदीने प्रयत्न करायला हवे.”