breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिल्लीच्या उप-मुख्यमंत्री कार्यालयातील बड्या अधिकाऱ्याला 2 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी सीबीआयने दिल्ली सरकारच्या बड्या अधिकाऱ्याला लाच प्रकरणात अटक केली. या अधिकाऱ्याचे नाव गोपाल कृष्ण माधव असून ते उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) पदावर कार्यरत होते.

त्यांनी 2 लाख रुपयांची लाच घेतली होती असा आरोप करण्यात आला आहे. गोपाल सध्या सीबीआयच्या मुख्यालयात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. सोबतच, या प्रकरणात मनीष सिसोदिया यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

2015 सिसोदिया यांच्या कार्यालयात ओएसडी म्हणून नियुक्त करण्यात आलेला आरोपी सध्या जीएसटी गोळा करण्याची जबाबदारी सांभाळत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जीएसटीचे एक प्रकरण मिटवण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले होते.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सिसोदिया म्हणाले, आम्ही सीबीआयच्या कारवाई आणि टायमिंगवर कुठलाही प्रश्न उपस्थित करत नाही. जो कुणी लाच घेत असेल त्याला तत्काळ अटक करायला हवी. भ्रष्टाचाराच्या विरोधात आमच्या सरकारने कठोर भूमिका घेतलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button