breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराष्ट्रिय

दिलासादायक! फ्रान्सहून 5 राफेल विमानं भारतासाठी रवाना, अंबाला एअरबेसवर होणार तैनात

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सामील होण्यासाठी पाच राफेल लढाऊ विमान फ्रान्सहून निघाले आहेत. सात भारतीय वैमानिक या पाच लढाऊ विमानांना अंबाला एअरबेसवर घेऊन येत आहेत. असे सांगितले जात आहे की हे पाच लढाऊ विमान फ्रान्समधून भारतात येत असताना 28 जुलैला संयुक्त अरब अमिरातीच्या अल डाफरा एअरबेस येथे (युएई) उतरवले जाणार आहेत.

अल डाफरा एअरबेसची जबाबदारी फ्रान्स एअरफोर्सवर आहे. येथे राफेल विमानांचं चेकिंग आणि इंधन भरण्याचे काम केले जाईल. यानंतर 29 जुलै रोजी सकाळी पाच राफेल विमानं भारतात पोहोचतील. राफेलला अंबाला एअरबेसवर तैनात केले जाणार आहे. फ्रान्सकडून 36 राफेल विमान खरेदी करण्याचा भारताने करार केला असून त्यापैकी पाच विमाने दिली जात आहेत. अंबाला एअरबेसवर पोहोचल्यानंतरच राफेल विमान क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार आहे. यात स्कॅल्प, मेटेओर आणि हॅमर क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. राफेलचं पहिलं पथक अंबाला येथे तर दुसरं पश्चिम बंगालच्या हशिमारा येथे असेल.

पाच राफेल विमानांना हिरवा झेंडा दाखवताना फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सांगितले की, नवीन राफेल विमानं भारतीय हवाई दलाची लढाऊ क्षमता वाढणार आहे. याचा फायदा भारताला रणनीतिकदृष्ट्या होईल. आज भारतीय राष्ट्राच्या ताफ्यात सामील होण्यासाठी पाच राफेल विमानं फ्रान्सहून निघाले आहेत. राफेलच्या आगमनानंतर निश्चितच भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ होणार आहे. राफेलने लांब अंतरावर क्षेपणास्त्र सहज प्रक्षेपण केले जाऊ शकतात. हे लढाऊ विमान हवाई हल्ल्यांमध्ये सर्वात प्रभावी ठरणार आहे. भारतीय हवाई दलाकडे एकूण 36 राफेल येणार आहेत. जे पु़ढील 2 वर्षात भारताला मिळणार आहेत. राफेलच्या आधी भारतीय हवाई दलाकडे अशी लढाऊ विमानं आहेत जे शत्रूला धुळ चारु शकणार आहे. वायुसेनेकडे सध्या सुखोई, मिरज, मिग -29, जॅग्वार, एलसीए आणि मिग -21 अशी लढाऊ विमान आहेत. या व्यतिरिक्त, वाहतूकीसाठी चॉपर आणि हेलिकॉप्टर देखील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button