breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
तेलंगणा : गर्भवतीला उचलून अंगणवाडी सेविकांचा ७ किमीचा पायी प्रवास; प्रवासातच गर्भवतीने दिला बाळाला जन्म
तेलंगणा । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
आरोग्य आणि अंगणवाडी सेविकांनी गर्भवती आदिवासी महिलेला कावडीद्वारे खांद्यावर घेवून पुद्रगुडेम गावातून भद्रद्री कोठागुडेम येथील मुलाकल्पपल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल ७ कि.मी. लांबीचा प्रवास केला.
या प्रवासात संबंधित महिलेला कावडीतून ( घरगुती स्ट्रेचर) नेले. जेव्हा जंगलातून जाताना संबंधित महिलेने सुंदर बाळाला जन्म दिला. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांच्या कार्याचे या भागात कौतूक होत आहे.