breaking-newsताज्या घडामोडी

तुकाराम मुंढे पुन्हा ‘अ‍ॅक्शन’ मोडमध्ये; चार कर्मचाऱ्यांना दणका

नागपूर | महाईन्यूज

नागपूर महानगपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी जोमानं कामाला सुरूवात केली आहे. तुकाराम मुंढे यांनी रूजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लेखा आणि वित्त विभागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी या विभागात कार्यरत असलेल्या चार कर्मचाऱ्यांना दणका देत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. आपल्या कामात अनियमितता केल्याचा ठपका या कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशीही तुकाराम मुंढे सकाळी आपल्या वेळेवर कार्यालयात दाखल झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी तब्बल सहा बैठका घेत कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मनपाच्या आर्थिक स्थितीची आणि अन्य कामांचीही माहिती घेतली आहे.

तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिका क्षेत्रातही जनेतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सुरू केला. तसंच त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी ते एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर होते. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने त्यांची एडस नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेत येणार हे कळल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी धसका घेतला होता. तसंच अनेक कर्मचारी वेळेपूर्वी कार्यालयात हजर राहत असल्याचंही समोर आलेलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button