ताजमहालाच्या संवर्धनात गलथानपणा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/supreme-court-copy.jpg)
- सर्वोच्च न्यायालयाचे एएसआयवर ताशेरे
नवी दिल्ली – ताजमहाल या ऐतिहासिक वास्तुच्या संवर्धन आणि संरक्षण कार्यात केलेल्या गलथानपणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया (एएसआय) वर जोरदार ताशेरे मारले आहेत. त्या भागातील किड्यांचाही या वास्तुला उपद्रव होत असल्याचे लक्षात आले आहे त्यावर एएसआयने काय उपाययोजना केली आहे अशी विचारणाही न्यायालयाने त्यांना केली आहे.
या विषयावर आज न्या एम. बी. लोकुर आणि न्या दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली त्यावेळी ऍडिशनल सॉलिसिटर जनरल नाडकर्णी यांनी या विभागाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना उद्देशून न्यायालयाने टिपण्णी केली की एएसआयने आपली जबाबदारी ओळखून तेथे काम केले असते तर आज न्यायालयीन सुनावणी घेण्याची वेळच आली नसती.
ताजमहालाच्या रक्षणासाठी एएसआयची तेथे गरज आहे की नाही हे स्पष्ट करा अशी सूचनाही त्यांनी नाडकर्णी यांना केली. या वास्तुंच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची मदत घ्या अशी सुचना न्यायालयाने सरकारला केली आहे त्यावर विचार सुरू आहे असे नाडकर्णी यांनी यावेळी नमूद केले. यावर्षी मार्च महिन्यातच सर्वोच्च न्यायालयाने ताजमहालाच्या संरक्षणाची सविस्तर योजना सादर करण्याचा आदेश उत्तरप्रदेश सरकारलाही दिला आहे.