Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
…तर धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन होण्याचा धोका; असदुद्दीन ओवैसी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/OWAISI-KHASDAR-MODI.jpg)
हैदराबाद:- एनआरसी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधलेला आहे. देशभरात एनआरसी लागू केल्यानंतर मुस्लिमांचे नागरिकत्व बादशाह सलामत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इच्छेवर निर्भर असणार आहे. त्यामुळे एनआरसी लागू केल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम घडू शकतात असं त्यांनी सांगितले आहे. मात्र यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संपूर्ण देशात एनआरसी लागू करणार असं सांगितलेले आहे.
ओवैसी यांनी ट्विट करुन सांगितले आहे की, एनआरसीसाठी कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास मुस्लिमांना गैर भारतीय मानलं जाईल. मग तेव्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जर आपली कागदपत्रे मोदींना योग्य वाटली तरच ते मान्य होईल. त्यामुळे जर एनआरसी लागू झाली तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील असा दावा ओवैसींनी केला आहे.