breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तब्बल ६ महिन्यांनंतर प्रथमच दिल्लीतील निजामुद्दीन दर्गा खुला

नवी दिल्ली – तब्बल ६ महिन्यांनंतर प्रथमच राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध हजरत निजामुद्दीन दर्गा आज रविवार ६ सप्टेंबरपासून भाविकांसाठी खुला करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे दर्गा बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता जरी तो खुला केला असला तरी या ठिकाणी कोरोना विषाणू संसर्ग आजारासंदर्भातील सर्व काळजी घेतली जाणार असून सोशल डिस्टन्सिंगचे पालनही केले जाणार आहे. आज सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत हा दर्गा जनतेसाठी खुला करण्यात आला होता.

हजरत निजामुद्दीन दर्ग्याचे प्रभारी सय्यद आदिब निझामी यांनी सांगितले की, ‘कोविड संदर्भात सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारची तयारी केली आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही दर्गा बंद ठेवला होता. मात्र आता सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आम्ही दर्गा खुला केला आहे. लोकांना दर्ग्यात प्रवेश केल्यानंतर निशाणी केलेल्या जागेतच उभे राहावे लागत आहे. सर्वांना केवळ १५ मिनिटेच दर्ग्यामध्ये थांबता येईल.’

आज सर्व भाविकांसाठी दर्ग्यात सॅनिटायझरची सोय करण्यात आली आहे. दर्ग्यामध्ये प्रत्येक भविकांमधील अंतर कमीतकमी ६ फूट इतके ठेवण्यात आले. दर्ग्यात सर्वांना मास्क लावणे बंधनकारक आहे. बॅग किंवा अन्य सामान आतमध्ये घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button