breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. नॉर्वेच्या खासदाराने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या ऐतिहासिक शांतता करारासाठी ट्रम्प यांचे नाव सुचवले आहे. या करारामुळे दोन्ही देशातील जवळपास ७२ वर्षांचे वैर संपले आहे.

खासदार टायब्रिंग-ग्जेडे यांनी म्हटले की, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये शांतता करार होणे ही खूप मोठी बाब आहे. जागतिक शांततेसाठी हे खूप मोठी पाउल आहे. त्याशिवाय, आतापर्यंत शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांपेक्षाही अधिक महत्त्वाचे कार्य ट्रम्प यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांनी १३ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करार करत असल्याची घोषणा केली होती. मागील महिन्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर या कराराला मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मध्य-पूर्व आशियात शांतता प्रस्थापित होईल असे अमेरिकेने म्हटले होते.

या करारानुसार, इस्रायलला आता पश्चिम किनाऱ्यावरील काही भागांना आपल्या अधिकार क्षेत्रात घेण्याच्या योजनेला स्थगिती द्यावी लागणार आहे. इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान गुंतवणूक, पर्यटन, थेट विमान सेवा, सुरक्षा आदी मुद्यांवर द्विपक्षीय करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन्ही देशांमध्ये नुकतीच व्यावसायिक विमान सेवाही सुरू झाली. व्हाइट हाउसमध्ये १५ सप्टेंबर रोजी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमधील शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे.

भारतालाही फायदा

भारताचे आखाती देश आणि इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत. भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर अरब देशांतून होतो. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये शांतता रहावी अशी भारताची भूमिका आहे. सौदी अरेबियादेखील भविष्यात इस्रायलसोबत करार करण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत. अशातच पाकिस्तान सौदीपासून दुरावल्यास भारताला आर्थिक आणि सामरीकदृष्ट्या मोठा फायदा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button