breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक धक्का; Snapchat ने कायमस्वरुपी केले बॅन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गेल्या काही दिवसांत अनेक धक्के बसले आहेत. धक्क्यांची ही मालिका सुरूच असून फेसबुक, ट्विटरनंतर गुगलची मालकी असलेल्या यूट्यूबनेही डोनाल्ड ट्रम्प यांचे अधिकृत अकाऊंट बंद केले. यानंतर आता ट्रम्प यांना आणखी एक झटका बसला आहे. सोशल नेटवर्किंग अ‍ॅप स्नॅपचॅटने ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन केले आहे.

वाचा :-ट्रम्प यांच्या विरोधात दुसऱ्यांदा महाभियोगाचा प्रस्ताव पारित; तसं होणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष

ट्रम्प समर्थकांकडून अमेरिकेच्या ‘संसदे’वर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक सोशल मीडिया कंपन्या ट्रम्प यांना बॅन करत आहेत. आता स्नॅपचॅटने डोनाल्ड ट्रम्प यांना कायमस्वरुपी बॅन करत असल्याचे जाहीर केले आहे. ‘आम्ही लोकांच्या हिताची काळजी घेत डोनाल्ड ट्रम्प यांना आमच्या व्यासपीठावर कायमची बंदी घातली आहे’, अशी माहिती स्नॅपचॅटच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. तसेच ट्रम्प यांच्या अकाऊंटवरुन चुकीच्या सूचना, चिथावणीखोर भाषण पोस्ट होत होते. हे आमच्या धोरणाविरोधात होते, त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली, असेही कंपनीने म्हटले आहे.

वाचा :-ट्रम्प यांच्याविरोधात दुसऱ्यांदा महाभियोग प्रस्ताव; अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष

दरम्यान, ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट पुन्हा रिस्टोअर केले आहे. मात्र यानंतर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ट्विटर अकाऊंट कायमचे बंद केले जाईल, असा इशाराही कंपनीकडून देण्यात आला आहे. परंतु फेसबुकने मात्र आपली कारवाई कायम ठेवली आहे. फेसबुककडून डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच यूट्यूबने डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलचे कमेंट सेक्शनही बंद करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या यूट्यूब चॅनेल सब्सक्राइबर्सची संख्या 2.77 मिलियन आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button