ट्रम्प-किम जोंग उन भेटीनिमित्त खास शांतिवार्ता नाणे जारी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/peace-talk-coin.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – व्हाईट हाऊसने ट्रम्प-किम जोंग उन भेटीनिमित्त खास शांतिवार्ता नाणे जारी केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्यातील शिखर 12 जून रोजी सिंगापूर येथे होणार आहे. या भेटीनिमित्त व्हाईट हाऊसने एक खास नाणे जारी केले आहे.
या नाण्याच्या एका बाजूला परस्परांकडे पाहत असलेले डोनॉल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन यांचे चेहरे आहेत. वरच्या बाजूला पीस टॉक असे शब्द आणि खालच्या बाजूला 2018 हे वर्ष आहे. डाव्या बाजूला युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि उजव्या बाजूला डेमॉक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया असे शब्द आहेत. आतील बाजूल प्रेसिडेंट डोनॉल्डस् ट्रम्प आणि उजव्या बाजूला सुप्रीम लीडर किम जोंग उन असे लिहिलेले आहे. नाण्याच्या मागील बाजूस व्हाईट हाऊस, एयरफोर्स 1 आणि अध्यक्षांचा शिक्का आहे.
नाण्यावरील किम जोंग उनच्या फोटोबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात् किम जोंग उनच्या हनुवटीवर थोड्य जास्तच वळ्या दाखवण्यात आलेल्या आहेत, तर ट्रम्प त्यांच्याकडेआक्रमकपणे रोखून पाहत आहेत.
अमेइकन अध्यक्षांच्या परदेश दौऱ्यापूर्वी व्हाईट हाऊस स्मरणिका म्हणून एक नाणे जारी करीत असते. एका एजन्सीमागर्फत ही नाणी निर्माण करण्यात येतात आणि वितरित केली जातात. ही नाणी परदेशी पाहुणे, अधिकारी आण् लिष्करी अधिकारी यांनी स्मृतिचिन्ह म्हणून देण्यात येतात. त्याचप्रमाणे व्हाईट हाऊसच्या गिफ्ट हाऊसमध्ये ही नाणी मर्यादित प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात.