breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
टीआरपी घोटाळा: ‘रिपब्लिक टीव्ही’ कडून एक कोटी घेतल्याचे बाहेर आले
पैसे देऊन टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने रिपब्लिक टीव्हीच्या ह्या चॅनेल ची अजून एक माहिती समोर आणली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ह्या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण व हवालाचा वापर करण्यात आल्याचे एका आरोपीच्या चौकशीतून समोर आले आहे. यासोबत त्या आरोपीने कबुल केले कि जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत रिपब्लिक वाहिनीकडून एक कोटीपेक्षा अधिक रक्कम त्याने स्वीकारली आहे.