टिकटॉक व्हिडिओ बनविल्यामुळे तरूणाची काढली नग्न धिंड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Tiktok.jpg)
जयपूर | जयपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात आपल्या बहिणीसोबत टिकटॉक व्हिडिओ बनविल्याने तिघांनी एका तरूणाची नग्न करून धिंड काढली आहे. आरोपींनी मुलाला बेल्टने मारहाणही केली आणि रस्त्यावर नग्न करून त्याची धिंड काढली आणि त्याचा व्हिडिओ बनवल्याची घटना घडली आहे.
व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, मुलाला नग्न करून फिरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्याचा चेहरा झाकलेला आहे. व्हिडिओमध्ये पीडित आरोपींची माफी मागताना दिसत आहे. तर आरोपी त्याला शिव्या देत म्हणत आहे की त्याने जो टिकटॉक व्हिडिओ बनविला त्यामुळे त्याला त्याची शिक्षा दिली जात आहे.
तर मुलाच्या कुटुंबाने सांगितले की घटनेनंतर तो इतका घाबरला की भीतीने तो घरत पळत आला. शनिवारी मुलाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. आरोपींवर आयटी कायद्यांतर्गत आणि इतर कलमांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या तक्रारीनंतर मुलाची नग्न धिंड काढणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर घटनेच्या व्हिडिओ बनविणाऱ्यापैकी दोघे जण फरार आहेत. किशोरवयीन मुलाच्या कुटुंबानंतर मुलाच्या कुटुंबियांनी पोक्सो अंतर्गत तीन जणांवर तक्रार दाखळ केली आहे.