breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘ज्यांना वंदे मातरम मान्य नाही, त्यांना देशात राहण्याचा हक्क नाही’- केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी

गुजरात | महाईन्यूज

“ज्यांना वंदे मातरम मान्य नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही”, असे विधान केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी यांनी सुरतमधील एका कार्यक्रमात म्हटलेले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसवर सीएएसंबंधी चुकीच्या अफवा पसरवण्याचा आरोपही लावला. सारंगी यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतरही अशाच प्रकारचे विधान केले होते.

सारंगी पुढे म्हणाले की, “देशभरात आग लावणारे खरे देशभक्त नाहीत. ज्या लोकांना भारताचे स्वातंत्र्य, एकता, वंदे मातरम स्वीकारायचे नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. देशातील जनतेने सीएए लागू केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानायला हवे आहेत. आता पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांग्लादेशमधील धार्मिक आत्याचारांना बळी पडलेले हिंदू, शिख, जैन, पारसी, बौद्ध आणि ख्रिश्चनांना भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button