breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकराष्ट्रिय

जेईई मेन्सचा निकाल जाहीर, २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.


जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली.

जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर – १ (बीई / बीटेक)

प्रवर्ग – कट ऑफ

सर्वसाधारण रँक यादी – ९०.३७६५३३५

आर्थिक वंचित गट – ७०.२४३५५१८

ओबीसी – ७२.८८८७९६९

एससी – ५०.१७६०२४५

एसटी – ३९.०६९६१०१

दिव्यांग – ०.०६१८५२४

JEE MAIN 2020 चा निकाल जाहीर; २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

एकूण २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. जानेवारी आणि सप्टेंबर असा दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतला आहे. एनटीएचं स्कोअर कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button