जीवघेण्या कोरोना आजारातून रुग्णाला वाचवण्यात यश… डॉक्टरांनी केला डान्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-209.png)
चीनसह संपूर्ण जग जीवघेण्या कोरना विषाणूविरोधात लढत आहे. या जीवघेण्या आजारातून रुग्णाला वाचवणे हे एका मोठ्या पराक्रमापेक्षा कमी नाही. अशातच चीनमध्ये सहा कोरोना रूग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर आनंद व्यक्त करत डॉक्टरांनी डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पीपल्स डेली चायनाद्वारे ट्वीट करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन डॉक्टर रुग्णालयाबाहेर डान्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना लोकांनी डॉक्टरांच्या या यशाचे कौतुक केले आहे. तसंच त्यांनी कोरोना विषाणूचा सामना करणाऱ्या चीनसाठी प्रार्थना सुद्धा केली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आतापर्यंत कोरोनाने २ हजार ७१५ जणांचा बळी घेतला आहे. तर ८७ हजार नागरिकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी सांगितले की, ‘या विषाणूमुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या वुहान शहराची स्थिती बिकट झाली आहे.’ तर कोरोना विषाणूमुळे जगभरातील सर्वच देशांमध्ये भितीचे वातावरण आहे.