breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जिल्ह्यात 12 जुलैच्या मध्यरात्री पासून 20 जुलै पर्यंत संचारबंदी

कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 12 जुलै पासून संचारबंदी लागू केली जात आहे. 12 जुलैच्या मध्यरात्री पासून 20 जुलै 2020 पर्यंत ही संचारबंदी लागू राहील असे आदेश जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी शुक्रवारी काढले आहेत.

या दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यात देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, संचारबंदी लागू केली जात असली तरीही सरकारी आणि अत्यावश्यक सेवांना ठराविक वेळेसाठी सूट दिली जाणार आहे. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक राहील.

  • जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार, नांदेडमध्ये संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवांची वेळ सुद्धा ठरवून देण्यात आली आहे. यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी, वाहने, शासकीय वाहने इत्यादींना सूट राहील. या सर्वांना सोबत ओळखपत्र ठेवावे लागेल. आवश्यक त्या विभागाचा गणवेश सुद्धा घालावा लागेल. सर्व खासगी शासकीय रुग्णालये, औषधालय, आरोग्य कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादी सुरू राहतील.
  • प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपाद, वार्ताहार, प्रतिनिधी, वर्तमान पत्र वाटप करण्यासाठी वितरकांना सूट राहील. घरपोच वर्तमानपत्रे टाकता येतील.
  • दूध, भाजीपाला, पिण्याचे पाणी इत्यादी गोष्टी दुकानांवर किंवा आस्थापनांवर जाउन विकत घेता येणार नाहीत. या सर्वांना कॉलनी आणि गल्ल्यांमधध्ये फिरून आपला माल विकावा लागणार आहे. यासाठी केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे.
  • पेट्रोल पंप सुरू राहतील. परंतु, त्या सर्व कर्मचाऱ्यांना आपले आयकार्ड आणि गणवेश बाळगावे लागणार आहेत. घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुद्धा घरपोच दिला जाईल. त्यासाठी देखील सकाळी 7 ते दुपारी 2 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे.
  • औद्योगिक कारखाने सुरू ठेवले जाऊ शकतात. परंतु, कारखाना मालक आणि व्यवस्थापनाने त्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी.
  • 7 ते 2 दरम्यान, बी बियाणे, खत विक्री, गोदाम इत्यादी कामे सुरू ठेवली जाऊ शकतील. मालवाहतूक व्यवस्था सुद्धा सुरळीत सुरू राहील.
  • बँका केवळ अत्यावश्यक कामांसाठी खुले राहतील. यात शासकीय रक्कम भरण्याचे आणि बँकिंग व्यवहारांचा समावेश आहे. इतर व्यवहारांसाठी 10 पेक्षा अधिक ग्राहक असू नये.
  • जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी किंवा जिल्ह्यात येण्यासाठी केवळ वैद्यकीय कारणांसाठी ई-पास आधारेच प्रवास करता येणार आहे.
  • अंत्यविधी प्रक्रियेसाठी यापूर्वी जारी करण्यात आलेले नियमच लागू राहतील. असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button