Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा
जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले; 14 हजार 365 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/jayakwadi-dam-full.jpg)
पैठण – जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात रविवारी झालेल्या जोरदार पावसाचे पाणी जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात धडकत असल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागाने सोमवारी रात्री उशिरा जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे दरवाजे उघडण्यात आले. त्यापैकी 12 दरवाजे अर्ध्या फुटाने तर 6 दरवाजे 1 फुटाने वर उचलण्यात आले. जायकवाडीमधून गोदावरीच्या पात्रात 12 हजार 498 क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून 1 हजार 589 क्युसेक असा एकूण 14 हजार 365 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे. सोबतच डाव्या कालव्यातून 1000 व उजव्या कालव्यातून 800 क्युसेक विसर्ग वाढवण्यात आला आहे.असे जायकवाडी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.