Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या – नितीश कुमार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जातींसाठी लोकसंख्येवर आधारित आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र लोकसंख्येची योग्य माहिती उपलब्ध असेल तरच त्याची अमलबजावणी केली जाऊ शकते असंही ते म्हणाले आहेत.
जदयूचे वाल्मिकीनगरमधील खासदार वैद्यनात महतो यांचं निधन झालं आहे. यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली असून यानिमित्ताने आयोजित प्रचारसभेत नितीश कुमार बोलत होते. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं असून सध्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरु आहे.