Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
‘जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिकेचा पुन्हा सहभाग’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/2020-10-23_5f9272c4c39fb_joe-biden.jpg)
चीनने आंतरराष्ट्रीय नियमाधिष्ठित व्यवस्थेचे पालन करावे, असे मत अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केले असून जागतिक आरोग्य संघटनेत अमेरिका पुन्हा सहभागी होईल, असे स्पष्ट केले आहे. करोना साथ वाईट पद्धतीने हाताळून चीनच्या हातचे बाहुले बनल्याची टीका करत ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेतली व त्यांचा निधीही बंद केला होता. त्यानंतर बायडेन यांनी सांगितले, की चीनने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अध्यक्षीय चर्चेत बायडेन यांनी चीनला शिक्षा करण्याचे वक्तव्य केले होते पण त्यावर खुलासा करताना त्यांनी आता असे म्हटले आहे, चीनने संघटनेच्या नियमांचे पालन करावे एवढेच आमचे म्हणणे आहे.