breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#जय श्री राम : शिराळ्यातून शरद पवारांना १० हजार पत्र पाठवणार : योगेश कुलकर्णी

शिराळा ‍। जय श्री राम लिहलेली 10 हजार पत्र शिराळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शहर पवार  यांच्या सिल्वर ओक बंगल्यावर पाठवण्यात येतील, अशी माहिती भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी यांनी दिली.

योगेश कुलकर्णी म्हणाले की, भारतीय जनता युवा मोर्चा सांगली जिल्हा ग्रामीण, शिराळा तालुका यांच्या वतीने सत्यजित देशमुख, माजी राज्य मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, भाजयुमो प्रदेश प्रभारी संजयजी कोडगे यांच्या आवाहनानुसार, सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रभारी प्रविण फोंडे यांच्या मार्गदर्शनाने खासदार शरद पवार यांना पत्र पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

शरद पवार यांना प्रभू श्री राम यांच्या नावाची आठवण करून देण्यासाठी शिराळा तालुक्यातून ‘जय श्री राम’ असे लिहलेली 10 हजार पत्र पाठवण्याचा संकल्प आम्ही केला आहे. प्रत्येक गावातून आम्ही व आमचे कार्यकर्ते पत्र पाठवत आहेत त्याची कल्पना भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सागर खोत यांना दिली आहे.

तसेच, शिराळा तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष सागर नाईक, उपाध्यक्ष पांडुरंग गायकवाड, राजवर्धन देशमुख, बाबाजी घोडे,  जगदीश कदम, अमित कुंभार, विनोद पन्हाळकर, अमर पाटील, प्रदीप पाटील, रणजित नलवडे, रुद्राक्ष पाटील, महेश पाटील, विनोद भोसले, विजय नांगरे, संपत काळे, धनाजी सावंत, रोहन आटुगडे यांच्या माध्यमातून पत्र पाठवण्याच काम सुरु आहे, असेही योगेश कुलकर्णी यांनी सांगीतले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button