breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तीन भाजपा कार्यकर्ते ठार

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हत्या सुरूच आहेत. आता कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस फिदा हुसेन यांच्यासह ३ नेत्यांची हत्या केली. ओमर रशीद बेग आणि अबडर रशीद बेग अशी आणखी दोन नेत्यांची नावे आहेत.

सर्वाधिक मनोरंजन करणारं अॅप! साइन-अप करुन ५०० रुपये मिळवा
गुरुवारी रात्री आठ वाजता भाजपच्या या तीन नेत्यांवर दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती कुलगाम पोलिसांना मिळाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दहशतवाद्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. या हल्ल्यात फिदा हुसेन, उमर रशीद बेग आणि अबडर रशीद बेग हे तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू आहे. हा परिसर सुरक्षा दलांनी घेरला आहे. कुलगाम व्यतिरिक्त शोपियानमध्येही दहशतवादी हल्ला झाला आहे. यात एक तरुण जखमी झाला आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा ट्विट करून निषेध केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button