Breaking-newsताज्या घडामोडी
जम्मू काश्मीरमधून सहा दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घेतले ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/terrist.jpg)
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या बारामूलामधून सहा दहशतावद्यांना भारतीय लष्कराने ताब्यात घेतले आहे. भारतीय जवानांनी या दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या शस्त्रसाठ्यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा मोठा कट आखला होता असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लष्कर-ए-तैयबाचे हे दहशतवादी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून हे दहशतवादी बारामूला शहरामध्ये दडून बसले होते. ती जणांच्या हत्येमध्ये यांचा सहभाग असल्याची पुष्टीही पोलिसांनी दिली आबे. या दहशतवाद्यांजवळून हत्या करण्यात आलेली शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. एनआईएने सहा दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता त्यातील एकाने भारतीय सुरक्षा दलावर मोठ्ठा हल्ला करण्यासाठी आम्ही भारतात आलो असल्याची कबूली दिली आहे.