जगभरात कोरोना 77 लाखांहून अधिक कोरोनाबाधित
मुंबई | जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे 77 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. तर या महामारीमुळं मृतकांची संख्या आता चार लाख 27 हजारांवर गेली आहे. मागील 24 तासात 1 लाख 40 हजार कोरोना केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण 77 लाख 25 हजार लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 4 लाख 27 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 39 लाख 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत. जगातील 60 टक्के कोरोनाबाधित हे केवळ 8 देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 45 लाखांच्या घरात आहे.
वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात सहाव्या स्थानावर आला आहे. भारतात कोविडचे 309,603 रुग्ण आहेत. तर 8,890 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 146,383 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 154,330 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अमेरिका: कोरोनाबाधित- 2,116,672, मृत- 116,825
ब्राझील: कोरोनाबाधित- 829,902, मृत- 41,901
रशिया: कोरोनाबाधित- 511,423, मृत- 6,715
भारत: कोरोनाबाधित- 309,603, मृत- 8,890
यूके: कोरोनाबाधित- 292,950, मृत- 41,481
स्पेन: कोरोनाबाधित- 290,289, मृत- 27,136
इटली: कोरोनाबाधित- 236,305, मृत- 34,223
पेरू: कोरोनाबाधित- 220,749, मृत- 6,308
जर्मनी: कोरोनाबाधित- 187,251, मृत- 8,863
इराण: कोरोनाबाधित- 182,525, मृत- 8,659