breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

चीनसोबत तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज नरवणे लेह दौऱ्यावर

नवी दिल्ली | वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनसोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज अचानक दोन दिवसांच्या लेह दौऱ्यावर दाखल झालेत. दक्षिण पॅन्गाँग सरोवराजवळच्या भागात चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय जवानांनी नुकताच हाणून पाडला होता. तसंच पॅन्गाँग जवळच्या टेकडीवर भारतानं आपली पकड मजबूत केलीय.

आपल्या लेह दौऱ्यात लष्करप्रमुख लेह-लडाख भागातील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यात लष्करप्रमुख सीमेवर तैनात अधिकाऱ्यांशी रणनीतीवर चर्चा करू शकतात. उल्लेखनीय म्हणजे, भारत आणि चीन दरम्यान सैन्य संवादानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. अनेक भागांत दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांच्या फायरिंग रेंजमध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button