चीनमध्ये कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्या १००० पार, ४२००० जणांना लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/CoronaVirus_Indian_students_China.jpg)
बीजिंग | चीनमध्ये कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सोमवारी एकाच दिवसात १०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या १००० हून अधिक झाली आहे. या विषाणूमुळे संपूर्ण चीनमध्ये आरोग्य आणीबाणी असून, दैनंदिन व्यवहारांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. चीनमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ४२६३४ झाली आहे. सोमवारी रात्रीपर्यंत एकूण १०१६ रुग्णांचा या मृत्यू झाला होता.
चीनबाहेर हाँगकाँग आणि फिलापाईन्समध्ये या आजारामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार चीनबाहेर एकूण २४ देशांत कोरोनाची लागण झालेले एकूण ३१९ रुग्ण आहेत. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. चीनमधील आरोग्य विभागातील त्रुटी या आजारामुळे ठळकपणे दिसून आल्या आहेत, अशी स्पष्ट शब्दांत कबुली चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी दिली.
या आजाराचा आणखी फैलाव होऊ नये, यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचबरोबर उद्योग-व्यवसायांचे फार मोठे नुकसान होऊ नये. कर्मचाऱ्यांना जास्त दिवस सुटी द्यायला लागू नये, यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.