चीनमध्ये करोनामुळे मृत्यूचं वाढत प्रमाण…१५०० पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू तर,६० हजार जणांना करोनाचा संसर्ग…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-95.png)
चीनमध्ये करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण घटत नसून वाढत असल्याचे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. चीनमधील ३१ प्रांतांमध्ये करोनाचा संसर्ग झाला असल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये आतापर्यंत १५०० पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/05china-briefing10-mobileMasterAt3x-1024x683.jpg)
करोनाच्या संसर्गामुळे हुबेई प्रांतातील वुहान शहर सर्वाधिक प्रभावित झाले आहे. याच शहरातून करोनाचा संसर्ग सुरू झाल्याची माहिती आहे. गुरुवारी एकाच दिवशी चीनमध्ये तब्बल २५४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत जवळपास ६० हजार जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/0_TOPSHOT-CHINA-HEALTH-VIRUS-1024x768.jpg)
बुधवारी, २४२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता. तर, गुरुवारी २५४ जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी, चीनमध्ये करोनाबाधित १५ हजार १५२ जण नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. सर्वाधिक मृत्यू हे हुबेई प्रातांत झाले आहेत. २५४ पैकी २४२ जण हे हुबेई प्रातांतील नागरिक असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/image.jpg)
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेचे एक १५ सदस्यीय पथक चीनमध्ये दाखल झाले आहे. हे पथक करोना विषाणूच्या संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी चीनमधील वैद्यकीय विभागाला मदत करत आहे.