Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
चीनची हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Untitled-12.jpg)
अमेरिकेने दिलेल्या इशाऱ्याला न जुमानता चीनने हाँगकाँग सुरक्षा विधेयकाला मंजुरी दिली आहे. हॉँगकॉँगमध्ये गेल्या काही दिवसांपासून या विधेयकाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू आहे. अमेरिकेचा इशारा आणि आंदोलन याकडे लक्ष न देता चीनने विधेयकाला मंजुरी दिली आहे.
चीन सरकारने मंजूर केलेले विधेयक हे हाँगकाँगच्या स्वायत्ततेवर आणि लोकशाही मूल्यांवर घाला घालणारे असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मात्र गुरुवारी नॅशनल पीपल्स काँग्रेसने या विधेयकाला मंजुरी दिली. या विधेयकाला २८७८ जणांनी समर्थन दिले, एका सदस्याने विरोध केला तर सहा सदस्य या वेळी गैरहजर होते. पुढील काही दिवसांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. कायद्या अंतर्गत स्थानिकांचा हाँगकाँगमध्येच खटला चालविण्यात येणार आहे.