चंद्रपूर जिल्हा कोरोनामुक्त, खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/Vijay-Wadettiwar.jpg)
चंद्रपूर | कोरोनाबाबत आणि कोरोनाच्या रुग्णाबाबत प्रसारमाध्यमांमध्ये काही चुकीच्या बाबी या पसरवल्या जात आहेत. चेंद्रपूरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे, तरीही प्रसारमाध्यमांद्वारे तसे सांगितले जात असताना, या बाबी खोट्या आहेत, असे चंद्पूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामूळे या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. दरम्यान, चंद्रपूरातील एक माणूस इंडोनेशियावरुन आला होता. मात्र, त्याला नागपूरमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यावर नागपूरातच उपचार सुरु आहेत. त्याचा कोडही नागपूरचाच आहे, चंद्रपूराचा नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी फेसबुकद्वारे स्पष्ट केले.
त्यामूळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. चंद्रपूर जिल्हा पुर्णपणे कोरोनामुक्त आहे. आरोग्य प्रशासन, सरकार आणि मी स्वत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काळजी घेईन, असे आश्वासनही त्यांनी चंद्रपूरकरांना दिले आहे.