Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Pramod-Sawant-Goa-1.jpg)
गोवा – गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यात कोणतीही लक्षणं दिसत नसून ते सध्या त्यांच्या घरातच विलगीकरणात आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना त्यांनी होम क्वारंटाईन होण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘मी कोरोना पॉझिटीव्ह आढळू आलो आहे. माझ्यात कोरोनाची लक्षण दिसून येत नसून मी स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. मी घरून माझी कर्तव्य पार करत आहे. ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या आहेत त्यांनी योग्य ती काळजी घ्यावी’, असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.