breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गेल्या 24 तासात जवळपास 10 हजार नवीन रुग्ण, रुग्णांचा आकडा 2.26 लाख पार

नवी दिल्ली | देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 10 हजार नवीन रुग्ण समोर आले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी जारी केलेल्या अपडेट्सनुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 851 नवीन केस समोर आल्या आहेत. तर 273 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 5 हजार 355 लोक बरे झाले आहेत. आता देशातील एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 770 झाली आहे.

यामध्ये 6 हजार 348 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामधून बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढत आहे. आतापर्यंत जवळपास 50 टक्के म्हणजेच 1 लाख 9 हजार 462 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आता देशात 1 लाख 10 हजार 960 अॅक्टिव्ह केस आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. याच काळात कोरोना टेस्टची संख्या वाढली आहे. आयसीएमआर रिपोर्टनुसार गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 43 हजार 661 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. एका दिवसात टेस्ट करण्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. आतापर्यंत 43 लाख 86 हजार 376 सँपल टेस्ट करण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासांच्या आत 123 लोकांचा मृत्यू झाला आह. जो आतापर्यंत सर्वात मोठा आकडा आहे. तर एक दिवसपूर्वी 122 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत 2710 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 24 तासांच्या आत जवळपास 3 हजार नवीन केस समोर आल्या आहेत. तर रुग्णांचा आकडा 77793 पर्यंत पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button