breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग; ५ जणांचा होरपळून मृत्यू

गांधीनगर – गुजरातच्या राजकोटमधील एका कोविड रुग्णालयात भीषण आगीची घटना घडली असून या आगीत पाच रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाच्या आयसीयू कक्षात गुरुवारी रात्री आगीचा भडका उडाला. या कक्षात ११ रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी पाच जणांनी आपला जीव गमावला. या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तसेच अग्निशमन दलाने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा तोडत रुग्णांना बाहेर काढले. दरम्यान, आगीत अनेक रुग्ण होरपळे असून जखमी रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी देशभरातील प्रत्येक राज्यांमध्ये कोविड रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालये कार्यरत असून गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उदय शिवानंद रुग्णालय हे कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यात जवळपास 33 रुग्ण उपचार घेत होते. या रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री अचानक आग लागली. रुग्णालयातील आयसीयू कक्षात सर्वात आधी आगीचा भडका उडाला. आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. मात्र या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button