गुजरातमध्येही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, संघ प्रमुख मोहन भागत यांच्याहस्ते उद्घाटन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/3-11.jpg)
अहमदाबाद । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते गुजरात आरएसएस मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर इ.स. १९२५ रोजी डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी केली. १९२५ पासून हळूहळू संघाला महत्त्व प्राप्त होत गेले. अगदी स्थापनादिवसापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे. संघटनेचा मूळ उद्देश संघटित सांस्कृतिक राष्ट्रवाद असला तरी संघटनेच्या निर्मितीमागे, इतिहास काळात हिंदूधर्मीयात संघटनात्मकतेचा अभाव असल्याबद्दलचे कारण, मुख्यत्वे मुस्लिम आणि ख्रिश्चन मिशनरींकडून झालेल्या/करविल्या गेलेले धर्मांतर, पुरोगामी आणि वैश्वीकरणामुळे येणार्या पाश्चात्य जीवनशैलीच्या विघातक प्रभावांबद्दल नकार आणि संशयवाद, स्वातंत्र्यपूर्व काळातील गांधीवादाच्या जहालवादास नकार, अल्पसंख्याकांचे काँग्रेस/महात्मा गांधी यांच्याकडून होणारे नको तेवढे लाड आणि यांचा लोकानुनय ही प्रमुख कारणे होती.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/3-12-1024x576.jpg)