Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका; भरावा लागणार 16 कोटी डॉलर्सचा दंड
![Big blow to Google and Amazon; A fine of कोटी 160 million will have to be paid](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/google-amazon-fine.jpg)
नवी दिल्ली – गुगल आणि अॅमेझॉनला मोठा झटका लागला आहे. या दोघांनाही 16 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे.
वाचा :-नवी दिल्लीची हवेची गुणवत्ता अत्यंत खराब- IMD
फ्रान्समधील डेटा प्रायव्हसीवर लक्ष ठेवणाऱ्या एका संस्थेकडून हा दंड ठोठावण्यात आलाय. यानुसार अॅमेझॉन आणि गुगला 16.3 कोटी डॉलर्सचा दंड भरावा लागणार आहे.
CNIL च्या म्हणण्याप्रमाणे, गुगल आणि अॅमेझॉन कंपन्यांच्या फेन्च वेबसाईटने इंटरनेट युझर्सना ट्रॅकर किंवा कुकीजच्या बाबतीत मंजुरी मागितली नव्हती. या दोन्ही कंपन्यांनी काही काळापूर्वी वेबसाईट्स मध्ये बदल केले होते. परंतु हे बदल फ्रान्सच्या नियमांप्रमाणे योग्य नव्हते.